Share

शिवभक्तांनो…आपला जीव महत्वाचा, घरीच थांबा; संभाजीराजेंच एक पाऊल मागे

Published On: 

रायगड : जून ही तारीख महाराष्ट्राच्या, संपूर्ण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली गेली आहे. याच दिवशी स्वराज्यनिमिर्तीची मशाल रयतेमध्ये पेटवणाऱ्या शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला अन् राजं छत्रपती झाले. आता याच दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रायगडावरून आक्रमक आंदोलन केलं जाईल अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली असून मिळेल त्या वाहनाने रायगडावर दाखल व्हा, असा सांगावा संभाजीराजे यांनी दिला होता.

परंतु आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात टाळेबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाच्या गावातील परिस्थितीवरून ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पूर्णपणे बंद राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी कोणी गावात येऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी शिवभक्तांना केले आहे.

संभाजीराजे यांनी 6 जूनला किल्ले रायगडावर येण्याचे शिवप्रेमींना केलेले आवाहन आणि आता पाचाड गावामध्ये केलेली टाळेबंदी यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, आता कोरोनाचा धोका लक्षात घेता जीव महत्वाचा आहे, त्यामुळे घरीच थांबा असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. तसेच, यंदाच्या वर्षी देखील सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून राज्याभिषेक सोहळा अखंडितपणे साजरा केला जाईल असं आश्वासन दिलं आहे. यासोबतच, मराठा आरक्षणासाठीच्या पुढील लढ्याची घोषणा देखील राजसदरेवरून केली जाईल, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले संभाजीराजे ?

मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज !

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1888802974611246

दिनांक ५ व ६ जूनला थाटामाटात हा सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकार ने केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. यंदा सुद्धा “शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात” साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल.

गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते. सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला. तसेच, निसर्ग वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना, आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या परंपरेला खंड पडू देणार नाही, हा शब्द मी सर्वांना दिला होता. तो मी पूर्ण केला.

दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी…!

माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे. यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!