Share

पंजाबमध्ये राजकीय भूकंप; पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला राजीनामा

Published On: 

चंडीगड – पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंगआणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पाहायला मिळत होता. पक्ष श्रेष्ठींनी मध्यस्थी करून देखील सिद्धू हे खोड्या काढत असल्याचे दिसत होते यामुळेच वैतागून अखेर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे.

यातच सिद्धू समर्थक 40 आमदारांनी चिठ्ठी लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता आज या आमदारांची बैठक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 15 येथील काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत आहे मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून असे अपमान सहन करणार नसल्याचे सांगितले  होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी या इशाऱ्याला फारसे गांभीर्याने न घेतल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!