Share

पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण 

Published On: 

🕒 1 min read

चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद थांबताना दिसत नाही. सिद्धू समर्थक 40 आमदारांनी चिठ्ठी लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता आज या आमदारांची बैठक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 15 येथील काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत असल्याने या बैठकीत नेमकं काय होतंय, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याशिवाय संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत माहिती मिळताच अमरिंदर सिंग यांनी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि खासदार मनीष तिवारी यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी आधी जर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले गेले तर ते पक्षही सोडतील असं सांगितले जात आहे.

दरम्यान, पंजाबमधील 40 सिद्धू समर्थक मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बाजवा यांच्या नेतृत्वात हायकमांडला चिठ्ठी लिहिली होती. त्यात लवकरात लवकर आमदारांची बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर पंजाब काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्वाच्या बदलाची चर्चा चंदिगढमधील आमदारांच्या बैठकीने तीव्र केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!