🕒 1 min read
मुंबई: बीकेसी ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून मुंबई येथे मोठी दुर्घटना झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेची त्रिसदस्यांमार्फत चौकशी करावी, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र यावरूनच भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजप युतीचे विधान केवळ बीकेसीतील एमएमआरडीए पूल कोसळण्यावरून माध्यमांचे लक्ष हटवण्यासाठी देण्यात आले होते का? असा खोचक सवाल करणारे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
Was the Sena BJP alliance statement only given to divert media attention from the MMRDA bridge collapse in BKC ?
Seems like it ????— Nitesh Rane (@NiteshNRane) September 18, 2021
दरम्यान काल औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले.’ असे वक्तव्य केले होते. यावरूनच राज्यात सेना-भाजप युती याबाबत चर्चा सुरु झाल्या. तर नितेश राणे यांनी हे वक्तव्य म्हणजे पूल दुर्घटनेवरून माध्यमांचे लक्ष भरकटण्यासाठी केलेला फंडा असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात; प्रशासनाकडून नियमावली जारी
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
