🕒 1 min read
अहमदनगर : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महत्वाचं विधान केलं होतं. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं विधान करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील मंचावर होते.
गेल्या दोन दिवसांतील नेत्यांच्या विधानांमुळे राजकीय क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या असतानाच भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील आज सूचक विधान केलं आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काय विधान केलं याची मला कल्पना नाही. मात्र ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं. पण एक नक्की. राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणाचा मित्रंही नसतो. त्यामुळे काही चमत्कार होऊ शकतो,’ असं ते म्हणाले.
यासोबतच, ‘राजकारणात काहीही होऊ शकते. महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे. त्याला काही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्रं आले आहेत. सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने 20-25 वर्ष एकत्र राहून काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे,’ असं विधान करून विखे-पाटील यांनी देखील युतीच्या चर्चांना बळ दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान अन् आज जयंत पाटील आणि फडणवीस एकाच गाडीत
- ‘अडीच कोटी लसीकरणानंतर एका राजकीय पक्षाचा ताप वाढला’
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान बीकेसीतील पूल दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी दिले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
