Share

कांस्यपदक विजेत्या संघातील खेळांडूसाठी पंजाब सरकारकडून १ कोटीचे बक्षिस जाहिर

Published On: 

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी इतिहास घडवला आहे. कांस्यपदकाच्या लढाईत भारताने जर्मनीचा पराभव करत पदक पटकावले आहे. या सामन्यात भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ असा पराभव करत तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावले आहे.

या ऐतीहासिक विजयानंतर भारतीय हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यादरम्यान पंजाब सरकारने हॉकी संघातील पंजाब राज्याच्या खेळाडूला १ कोटी रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे. कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघात आठ खेळाडू हे पंजाब राज्यातील आहे. ज्यात कर्णधार मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, हार्दिक सिंह, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे.

काही दिवसापुर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात गोल करणारे खेळाडू हे पंजाबचे होते असे ट्विट केले होते. यानंतर क्रीडाप्रेमीनी त्यांना बॉलीवूडमधील ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील शाहरुख खानचा संवाद ऐकवत टीका केली होती. जर्मनीने या सामन्यात सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफुटवर ढकलले. मात्र तिसऱ्या सत्रापुर्वी भारताने सलग दोन गोल केले. यानंतर तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत आणखी दोन गोल करत ५-३ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!