Share

विद्यापीठाने जुन्या इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करून राज्यपालांचा अवमान केला– सामंत

Published On: 

मुंबई : राज्यपालांचा मराठवाडा दौरा सुरू होण्याआधीच चांगलाच वादात सापडला होता. त्यात आता दौऱ्यादरम्यान राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या इमारतीबाबतही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आक्षेप घेतला आहे. ही इमारत चार वर्षांपासून वापरात असल्याचा दावा सामंत यांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा एकदा समोर आलाय.

राज्यपाल यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान आढावा बैठका घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, राज्य सरकारच्या वतीने त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्या नंतर राज्यपाल यांनी आढावा बैठका नाही तर केवळ माहिती घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र, आता ज्या इमारातीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले, त्याच इमारतीवरुन मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल आणि विद्यापीठ प्रशासनावर टीका केली आहे.

या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यपालांवर उपहासात्मक टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘नांदेड मधील वापरात असलेल्या वसतीगृहाचे उद्घाटन माननीय राज्यपाल यांच्या हस्ते करून काय सिद्ध होणार? जुन्या इमारतीच्या उद्घाटनाचा अट्टाहास का? विद्यापीठाने जुन्या इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करून राज्यपालांचा अवमान केला आहे. माननीय राज्यपालांच्या प्रशासकीय यंत्रणेने ही माहिती घ्यायला हवी होती. माननीय राज्यपालांच्या हस्ते नवीन इमारत, नवीन शैक्षणिक उपक्रम, विद्यापीठातील नवीन वसतिगृह, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम असे समारंभ करणे हा त्यांच्या पदाचा सन्मान ठेऊन घेणं अपेक्षित आहे. चार वर्षे वापरात असलेल्या इमारतीचे उद्घाटन नाही.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!