पुणे: जिल्ह्यात कोरोना रेट अधिक असल्याने या ठिकाणी काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे पुण्यातील व्यापारी तसेच राजकाकीय मंडळीतून विरोध केला गेला. आता यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारला सवाल केला आहे. पुण्यात करोनाचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं इथं सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरावर अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अमृता फडणवीस या सध्या पुण्यात आहेत. त्यांच्या हस्ते एका हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी निर्बंधावर प्रतिक्रिया दिली. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे अयोग्य आहे. करोनाचे रुग्ण आता कमी झालेत. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत आहेत. त्यामुळे याठिकाणी निर्बंध शिथिल करायला हवेत असेदेखील त्या म्हणाल्या आहेत.
सरकारने लहान व्यापाऱ्यांचा विचार करायला हवा. सततच्या निर्बंधामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळते आहे. त्यामुळे पुणे भागाचा सरकारने विचार करायला हवा तर पुणेकरांनीच आंदोलन करायला हवे असेदेखील अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
