मुंबई : रविवारी दिल्लीयेथील छावणी भागात घडलेल्या बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या नऊ वर्षीय पिडीत कुटुंबाची भेट काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी घेतली. त्या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केला. मात्र हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का?असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणले, ‘राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर त्या कुटुंबासोबतचा फोटो टाकला. हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. हा काय प्रकार आहे. ही तर हुकूमशाहीच झाली. त्या कुटुंबाची माहिती विरोधी पक्षाचा नेता जनतेला देत असेल तर गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच नरेंद्र मोदी हे सुद्धा निर्भयाच्या कुटुंबांना भेटले होते. भाजपचे अनेक नेतेही गेले होते. तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा असं राष्ट्रीय महिला आयोग किंवा अन्य कुणी सांगितल्याचं आठवत नाही,’ असं राऊत यांनी निदर्शनास आणून दिलं.
दरम्यान, दिल्लीमध्ये एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. त्या मुलीच्या कुटुंबियांना राजकीय नेत्यांनी भेट देऊन त्यांचे सांगत्वन केले. यावर राजकीय वादंग निर्माण होताना दिसत आहे. काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत नाही का? असं भाजपवाले म्हणत आहेत. काँग्रेसने प्रत्युतर देत म्हंटले, आमच्या राज्यात बलात्कार होतात म्हणून तुमच्या राज्यातील बलात्कार माफ करायचे का?, असा सवाल त्यांनी केला
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
