Share

‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ भारत इंग्लंड सामन्यातील रिकामी खुर्ची आणि तिची कहाणी

Published On: 

मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारी ४ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या संघाने अक्षरश: गुडघे टेकले. भारतीय वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर अटोपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या बीनबाद २१ धावा झाल्या होत्या.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यापासून प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र इंग्लंडमधील भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. या सामन्यात प्रेक्षागृहात एक रिकामी खुर्ची सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती. कारण मैदानातील सर्व तिकीटे विकली गेली असताला ही रिकाम खुर्ची कुणाची असा प्रश्न चाहत्यांना पडला. यामागे एक वेगळी गोष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. ही रिकामी खुर्ची जॉन क्लार्क असे या तिकीट खरेदी करणाऱ्या क्रिकेट रसीकाचे नाव आहे.

पण महत्वाची बाब ही आहे की, जॉन क्लार्क हे जिवंत नाहीत. ४० वर्षापुर्वी त्यांचे निधन झाले आहे. मात्र जॉनच्या मित्रानी त्याची आठवण कायम रहावी म्हणून ट्रेंट ब्रिजमध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्याचे तिकीट खरेदी केले आहे. यामुळे जॉन यांनी गेल्या ४० वर्षात या मैदानात होणारा एकही सामना गमावला नाही. रिकाम्या खुर्चीचे तिकीट घेत त्यांच्या मित्रानी सिद्ध केले की, मृत्युही मैत्री तोडू शकत नाही. ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ या ओळीला समर्पक वाटावी अशी ही मैत्री सर्वांच्या चर्चेंचा विषय बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!