मुंबई : करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटानंतर कार्तीक आर्यनला साजीद नाडीयाडवालाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये संधी मिळाली. यानंतर कार्तीक आर्यनची वर्णी संजय लिला भन्साळीच्या आगामी बैजु बावरा या चित्रपटात त्याची वर्णी लागली होती. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट कार्तीकच्या हातुन निसटला आहे.
संजय लिला भन्साळी यांच्या आगामी महत्वकांक्षी ‘बैजु बावरा’ या चित्रपटात सुरुवातीला रणबीर कपुरला विचारण्यात आले होते. मात्र त्याने नकार दिल्याने या चित्रपटात कार्तिक आर्यनची वर्णी लागली होती. अशी चर्चा सुरु आहे. मात्र रणबीर कपुरने दिलेल्या नकारानंतर संजय लिला भन्साळी यांनी रणवीर सिंगचा या भूमिकेसाठी विचार केला आहे. मात्र यावर अद्यापही ठाम निर्णय झालेला नाही. मात्र रणवीर सिंगने गेल्या काही वर्षात भन्साळीसोबत बाजीराव मस्तानी, पद्मावत, रामलीला यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
त्यामुळे रणवीर सिंगची भन्साळीच्या या चित्रपटात एन्ट्री झाली तर नवल वाटायला नको. संजय लिला भन्साळींना सध्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चिंता लागली आहे. कारण हा चित्रपट ते ओटीटीवर प्रदर्शीत करु इच्छीत नाही. तर कोरोनाच्या कहरामुळे अद्यापही चित्रपटगृहे बंदच आहे. या परिस्थीतीत हा चित्रपट कधी प्रदर्शित करायचा अशी चिंता भन्साळी यांना सतावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचे पहिल्यांदाच सकारात्मक विधान
- विद्यापीठाने जुन्या इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करून राज्यपालांचा अवमान केला– सामंत
- ‘राहुल गांधींनी ‘त्या’ पीडित कुटुंबाचा फोटो प्रसिद्ध करणे गुन्हा आहे का?’, संजय राऊतांचा सवाल
- ‘पुण्यावर अजूनही बंधनं का आहेत, हेच मला कळेना?’, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
- ‘कोणाचा चष्मा चोरला?’ ; सोशल मीडियावर रिषभ पंतची जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

