इंग्लंड : इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० मालिकेत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला केवळ १४० धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील अखेरचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, महिला भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. षटकांची गती संथ राखल्याबद्दल टीम इंडियाला दंड बसला आहे. भारतीय खेळाडूंना सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने सोमवारी याची माहिती दिली आहे.
https://twitter.com/IExpressSports/status/1414635334453792768?s=20
भारतीय महिला संघ निर्धारित वेळापेक्षा मागे होता. या कारणास्तव सामना रेफरी फिल विटिक्सने संघाला शिक्षा सुनावली. कर्णधार हरमनप्रीत कौरने आपली चूक मान्य केली असून खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के दंड आकारला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मी स्वतःला जगातील सर्वोत्तम टेनिसपटू मानतो : जोकोविच
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेची ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये एन्ट्री


