इटली : रविवार ११ जुलैचा दिवस क्रीडा रसिकांसाठी चांगलीच पर्वणी ठरला. एकिकडे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली तर युरो कप स्पर्धेत इटलीने जेतेपद पटकावले. तर विम्बल्डन टेनीस स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने विक्रमी ग्रॅंडस्लॅम पटकावले.
काही दिवसापुर्वी फ्रेंचो ओपन स्पर्धेत ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या सार्बियाच्या जोकोव्हिचची गाडी सुसाट सुटली आहे. विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोव्हिचने पहिला सेट गमावल्यानंतर इटलीचा नवखा टेनीसपटु माटिओ बेरेट्टिनीचा सलग तीन सेटमध्ये पराभव करत विक्रमी २०वे ग्रँडस्लॅम पटकावले. या साम्यन्यात त्याने माटिओचा ६-७, ६-४, ६-४ आणि ६-३ असा पराभव करत विक्रमी ग्रँडस्लॅम पटकावले.
विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याची नोव्हाक जोकोव्हिचची ही सहावी वेळ आहे. तर हे त्याचे एकुण २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यासह जोकोव्हिचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
या सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, ‘मी स्वतःला जगातील सर्वोत्तम टेनिसपटू मानतो, अन्यथा मी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याबद्दल आणि ऐतिहासिक कामगिरी करण्याबद्दल इतक्या विश्वासाने बोलू शकलो नसतो. मात्र, मी टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे की नाही, हे इतरांनी ठरवावे, असेही जोकोविच म्हणाला. विविध पिढ्यांतील खेळाडूंमध्ये तुलना करणे फार अवघड आहे. पण, टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबाबत चर्चा करताना लोक माझे नाव घेतात याचा मला अभिमान आहे, असेही जोकोविचने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!


