नवी दिल्ली : आगामी उत्तर प्रदेश आणि इतक निवडणुकांसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्ली दरबारी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहे. याचाच भाग म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह मोठे नेते मोदींच्या निवासस्थानी उपस्थित होते. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजप नेते बीएल संतोष यांचीही उपस्थिती होती.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच क्लास घेतला. एकूण ११ राष्ट्रीय सचिवांचा सोशल मीडिया रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातात घेऊन बसले होते. एकूण २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले होते. त्यावर कोणकोणते नेते ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामवर व्यक्त झाले आहेत. याची इत्यंभूत माहिती मोदींकडे होती. त्यामुळे सर्वांची भंबेरी उडाली.
पंकजा मुंडे यांचा नंबर आल्यावर, ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता.. ‘लोकल’ मुद्द्यावर पण खूप बोलता. पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकल पेक्षा राष्ट्रीय मुद्द्याकडे जास्त लक्ष द्या,” असा सल्ला मोदीजींनी दिला. परंतु, हे सांगताना पंतप्रधान मोदींनी तुम्ही खूप बोलता या शब्दावर जोर दिला असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांचीही मोदींनी कानउघडणी केली. ‘सध्या अनेकांना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. परंतु आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही,’ असा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत लगावला. मंत्रीपद मिळालं नसल्यानं नाराज असलेल्या नेत्यांना मोदींनी चांगल्याच काचपिचक्या दिल्याची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अब्दुल सत्तारांना रोखण्याचे भाजपपुढे आव्हान, ग्रामपंचायत सदस्यांचा पुन्हा शिवसेना प्रवेश
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
- पुणेकरांना किंचित दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
