मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. विशेष म्हणजे या मलिकेतील अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी केलेली अर्चना-मानवची जोडी चांगलीच चर्चेत होती. या दोघांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली होती. नुकतेच ‘पवित्र रिश्ता २.०’ चे चित्रीकरण सुरू झाले आहे. आता येणाऱ्या नवीन पवित्र रिश्तामध्ये अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
https://www.instagram.com/p/CN-YHA-FcGo/?utm_source=ig_web_copy_link
या मालिकेत अभिज्ञा एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. अभिज्ञाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक मराठी मालिकेमध्ये तिने नकारात्मक भूमिका बजावली आहे. यामुळे तिला लोकप्रियता मिळाली आहे.
https://www.instagram.com/p/CRNskXZLjDc/?utm_source=ig_embed&ig_rid=2cd9c238-0822-4cbf-956c-6a7519aaae28
नुकतेच सोशल मीडियावर अंकिता लोखंडे आणि शाहीर शेख यांची ‘पवित्र रिश्ता २.०’ ची पहिली झलक समोर आली होती. या फोटोंमध्ये शाहीर आणि अंकिता लोखंडे सोबत ऊषा नाडकर्णी आणि रणदीप राय दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या सिक्वलमध्ये देखील उषा नाडर्णींचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच बरोबर मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील पाहायला मिळणार असल्याने चाहते या मालिकेची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मी स्वतःला जगातील सर्वोत्तम टेनिसपटू मानतो : जोकोविच
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

