मुंबई : सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कायम आहे. त्यामुळे आषाढी वारीदेखील कोरोना सावटात पार पडणार आहे. पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही आहेत. परंतु सरकारनं आषाढी वारीसाठी मोजक्याच आणि मानाच्याच पालख्यांना परवानगी दिली आहे. अशातच आता पायी वारी सोहळ्याच्या परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी देखील केली होती.
‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी’ असं विधान काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांची अनेक विधाने हे वादग्रस्त असून त्यांच्यावर सातत्याने टीकास्त्र देखील सोडण्यात येते.
आता संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. ‘कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे. वारकरी रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत,’ असं विधान भिडे यांनी केलं आहे.
त्यांच्या विधानांमुळे समाजवव्यवस्थेला बाधा निर्माण होत असून चिथावणीखोर वक्तव्यांमुळे गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.
‘संभाजी भिडे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहेत. इतकंच नाही तर आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा. असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा,’ असं सचिन खरात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्यांना लोकलप्रवासाची मुभा द्या नाहीतर पाच हजार प्रवास भत्ता द्या’; भाजपची मागणी
- आता गडकरीही म्हणाले, ‘इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप’; सुचवला ‘हा’ पर्याय
- संभाव्य तिसऱ्या लाटेत उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहावे यासाठी प्रयत्न करा – उद्धव ठाकरे
- ‘नितेश राणेंसारखी प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही’; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला
- पुणेकरांना किंचित दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
