🕒 1 min read
पुणे : आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक पार पडली आहे. आजच्या या बैठकीकडे पुणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे आणि सामान्यांचे खास लागले होते. पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ, इतर भाजप नेते यांच्यासह व्यापाऱ्यांनी केली होती.
आता पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. सध्या या दोन्ही शहरांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३ टक्क्यांच्या आसपास आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सूट देण्यास अनुकूलता दर्शवल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या दोन्ही शहरांमध्ये सोमवार ते शुक्रवार सर्व सेवा, दुकाने, व्यापार हे रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवार-रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. यासोबतच, हॉटेल्स सर्व दिवशी रात्री १० पर्यंत सुरु राहतील अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली.
मात्र ही सूट देतानाच अजित पवार यांनी पुणेकरांना एक इशारा देखील दिला आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा ७ टक्क्यांच्या वर गेला तर पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात येतील, असं म्हणत योग्य काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी जनतेला केलं आहे. यासोबतच, एकदा रेट हा ७ टक्क्यांवर गेला तर त्याने अधिक धोका वाढती व स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते, असं पवार म्हणाले.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात नेमकी काय सूट ?
सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार, यासाठी ५० टक्के आसन क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे. शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मॉल देखील सुरु करण्यात येणार असून मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘औट्रम घाटातील बोगद्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक’ ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची चंद्रकांत खैरेंना ग्वाही!
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- मराठा क्रांती मोर्चाची पाच वर्षे; छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत साजरा होणार वर्धापनदिन!
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- विमानतळ विस्तारीकरणाची जमिन घ्या; अन्यथा आरक्षण हटवा, कृती समितीची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
