Share

विमानतळ विस्तारीकरणाची जमिन घ्या; अन्यथा आरक्षण हटवा, कृती समितीची मागणी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र आता लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी घेतली जाणारी जमिन तातडीने अधिग्रहीत करावी, अन्यथा आरक्षण हटवावे यासह विविध मागण्यांचे निवेदन औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणग्रस्त कृती समिती आणि भाजपतर्फे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना देण्यात आले.

चिकलठाणा विमानतळासाठी तब्बल २८ वर्षांपूर्वी १९९३ मध्ये विमान दुर्घटनेनंतर शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत केल्या आहेत. तेव्हापासून या भागातील विकास खुंटला आहे. असे असतानाच आता पुन्हा विस्तारीकरणाच्या नावाखाली १८२ एकर जमिन अधिगृहीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या येथील बाजारभाव हा तीन ते चार हजार प्रति चौरस फुटाप्रमाणे देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. कार पार्कींगसाठी उत्तर बाजूला नागरीकांची घरे असल्याने दक्षिण बाजूची जागा घ्यावी.

अन्यथा अधिकचा मोबदला द्यावा, त्याचप्रमाणे या शेतकर्‍यांचे सुसज्ज आधुनिक पद्धतीने पुनर्वसन करावे. शेती आणि घरधारकांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन सर्व सुविधा द्याव्यात. तुकड्यातुकड्याने जमिन खरेदी न करता संपुर्ण गटाची जमिन खरेदी करावी. विस्तारीकरण लवकर करणार नसाल तर शेतकर्‍यांच्या जमिनी एलो झोनमध्ये वर्ग करुन विकास कामांना परवानगी द्यावी, अशा आदी मागण्या केल्या आहेत. याप्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब दहिहांडे, उपाध्यक्ष मदन नवपुते, सचिव सदाशिव पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!