पुणे : आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक पार पडली आहे. आजच्या या बैठकीकडे पुणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे आणि सामान्यांचे खास लागले होते. पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ, इतर भाजप नेते यांच्यासह व्यापाऱ्यांनी केली होती.
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीनंतर एक ट्विट करून पुणेकरांसाठी गोड बातमी दिली आहे. ‘मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक ! सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार असं मोहोळ यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आता विकेंड लॉकडाऊन देखील हटवण्यात आला आहे.
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक !
– सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
– हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
– शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
– मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 8, 2021
आता शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आता मॉल देखील सुरु करण्यात येणार असून मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, २ दिवसांपूर्वी मॉलमधील कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत लवकरात लवकर मॉल सुरु करावे अशी मागणी केली होती.
पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट किती ?
गेल्या पाच आठवड्यात पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट सातत्याने घटत असून ४ ते १० जुलै या आठवड्यात ४.९८ टक्के असणारा पॉझिटिव्हीटी रेट २.८८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

