Share

‘औट्रम घाटातील बोगद्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक’ ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची चंद्रकांत खैरेंना ग्वाही!

Published On: 

औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग औट्रम घाटातील बोगदा अंतर्गत उपक्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत नागरिकांचा मागण्यांसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांती नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत घाटातील बोगदा करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिली.

औट्रम घाटातील बोगदा कामाला गती मिळणार असून याबाबत हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच या कामाला मंजुरी देणार आहे. नवी दिल्ली येथे सचिव राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अध्यक्ष गिरीधर अरमाने यांच्याशी त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. औरंगाबाद- चाळीसगाव रेल्वे विभागासोबत संयुक्तपणे रेल्वे लाइनचे काम करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली. यावेळी खर्च जास्त लागत असल्याचे सांगत हे काम रद्द झाल्याची चुकीची माहिती पसरवण्यात आली.

मात्र या खर्चामध्ये थोडीफार कपात करून मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रीय ५२(२११) हायवे क्रॉसिंगवर आत्तापर्यंत ३५ ते ४० अपघात झाले असून यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये गल्लेबोरगाव ते देवगाव राज्य महामार्ग लासुर स्टेशन हा रस्ता ओलांडताना अपघाताची नवीन समस्या निर्माण झाली आहे. बोरगाव, टाकळी, चापानेर आदी ३५ ते ४० गावांची समस्या असून याबाबतही प्राधिकरणाला योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. कन्नड बायपास, अंधानेर येथे सर्व्हिस रोडची गरज असून ती तात्काळ मान्य करावी अशी विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!