औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला होता. याच घटनेनंतर मराठा क्रांतिपर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लाखोंचे मोर्चे निघाले तेही अगदी शांततेत. यात अग्रस्थानी असलेले औरंगाबाद चर्चेत होते. आरक्षणासाठी याच परिसरातील काकासाहेब शिंदेंच्या बलिदानाने सुन्न झालेला समाज अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. पाच वर्षांपूर्वी याच औरंगाबादच्या मातीत मराठा क्रांती मोर्चाचे रोपटे लावण्यात आले होते. या रोपट्यास उद्या ५ वर्षे पूर्ण होत आहेत.
पाच वर्षांपूर्वी ९ ऑगस्टला औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. ९ रोजी पुणे येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक असल्याने मराठा क्रांती मोर्चाचा पाचवा वर्धापन दिन १९ ऑगस्टला छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी (दि.७) देण्यात आली.
टीव्ही सेंटर येथील बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या विभागीय कार्यालयात समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा समन्वयक किशोर चव्हाण, चंद्रकांत भराड, सुरेश वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीमध्ये वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचे नियोजन मराठवाड्यातील आरक्षण व स्वतंत्रपणे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर चर्चा झाली. पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय बैठकीत मराठवाड्यातील समन्वयकांचे कोणकोणते प्रश्न मांडायला पाहिजे यावरही पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले.
महत्त्वाच्या बातम्या
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- विमानतळ विस्तारीकरणाची जमिन घ्या; अन्यथा आरक्षण हटवा, कृती समितीची मागणी!
- पासपोर्ट मिळणे होणार सोपं आणि जलद; आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच करता येणार अर्ज
- क्रीडा विद्यापीठासाठी चंद्रकांत खैरेंचा कार्यकर्ता बनेल, खा जलीलांचे आवाहन
- #Birthday Special : जाणून घ्या मीराबााई चानूच्या आयुष्यातील काही गोष्टी


