🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे पालकांना आरटीई प्रवेशासाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ७ ऑगस्टपर्यंत शाळांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत दिली होती. आरटीई अॅक्टनुसार ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेता येत नाही. २ ऑगस्टला प्रवेश देणे बेकायदेशीर आहे. आरटीई अॅप्लिकेशनसमोर नॉट अप्रोच हे कारण व कागदपत्र तपासणी करणाऱ्या समितीला बंधनकारक आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी आरटीई पालक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ६०३ शाळा पात्र आहेत. येथील प्रवेश क्षमता ३ हजार ६२५ आहे ऑनलाइन सोडतीत प्रवेशासाठी ३४७० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आत्तापर्यंत प्रवेशासाठी चार वेळा मुदतवाढ दिली होती. आतापर्यंत २४८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. १४८२ पालकांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत.
१ जुलैपासून ७ ऑगस्टपर्यंत शाळांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत शनिवारी संपली. शिक्षण विभागाकडून पुढील प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये. यासाठी काम करणारा पालक संघाने २ ऑगस्ट नंतर झालेल्या प्रवेशाबाबत चौकशी करावी अशी मागणी आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पासपोर्ट मिळणे होणार सोपं आणि जलद; आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच करता येणार अर्ज
- क्रीडा विद्यापीठासाठी चंद्रकांत खैरेंचा कार्यकर्ता बनेल, खा जलीलांचे आवाहन
- #Birthday Special : जाणून घ्या मीराबााई चानूच्या आयुष्यातील काही गोष्टी
- महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये ३४६६ जागांसाठी लवकरच होणार मेगाभरती
- सीबीआयचे सरकारला पत्र, पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची मागितली परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
