Share

PUNE- येरवडा जेलमध्ये डिएसकेंना माजी आमदाराने घेतला चावा ?

Published On: 

पुणे :  पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर डी.एस. कुलकर्णी (DS Kulkarni) उर्फ डीएसके (DSK) आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांना पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.  गुंतवणूकदाराची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मागील चार वर्षापासून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके येरवडा कारागृहात आहे. बँक घोटाळ्यातील एका आमदाराने डीएसके यांचा चावा घेतल्याची माहिती काही वेळापूर्वी सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वेगळंच सत्य सांगितलं आहे.

डीएसके हे साधारण २० दिवसांपूर्वी घसरून पडले होते. त्या घटनेत त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यावर ससून रुग्णालयात उपचार करून पुन्हा कारागृहात आणण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती उत्तम असून ते सुखरूप आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावर डीएसकेबाबत चुकीची आणि खोडसाळपणे माहिती पसरविली गेली आहे. त्याबद्दल आम्ही शोध घेत आहोत, असे राणी भोसले यांनी सांगितले आहे.

मागील १० ते १२ दिवसांपूर्वीचा हा प्रकार उघडकीस आला असून सगळीकडे या प्रकरणाची खळबळ उडाली आहे. बड्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव डी. एस. कुलकर्णी असून त्यांना बँक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या आमदाराने त्यांच्या हाताला चावा घेतला. कारागृहात असताना सुद्धा बांधकाम व्यावसायिक बिनधास्त फिरतात त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, याचा राग मनात घेऊन आमदाराने डी. एस. के. यांच्या हाताला चावा घेतला, अशी खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!