Share

पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला गहू पाठवण्यास इम्रान खान यांची परवानगी

Published On: 

नवी-दिल्ली : इस्लामाबादमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अफगाणिस्तान आंतर-मंत्रालय समन्वय कक्षाच्या (AICC) पहिल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांनी भूषवले. यावेळी इम्रान यांनी त्यांचे सरकार भारताला ५०,००० मेट्रिक टन गहू शेजारच्या अफगाणिस्तानला त्यांच्या हद्दीतून पाठवण्याची परवानगी देईल, अशी घोषणा केली.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान केवळ अफगाणिस्तानला भारतात माल निर्यात करण्यास परवानगी देत आहे. परंतु, सीमा ओलांडून इतर कोणत्याही दुतर्फा व्यापारास परवानगी देणार नाही. मागील महिन्यात, भारताने अफगाणिस्तानसाठी मानवतावादी मदत म्हणून ५०,००० मेट्रिक टन गहू देण्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानला वाघा सीमेवरून अन्नधान्य पाठवण्याची विनंती केली.

दरम्यान, अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनीही इम्रान यांना पाकिस्तानमार्गे गहू वाहतूक करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती आणि सुचवले होते की तालिबान सरकार भारताकडून मानवतावादी मदत स्वीकारण्यास तयार आहे. अफगाण लोकांच्या मानवतावादी गरजांमध्ये भारताने योगदान दिले आहे. यामध्ये गेल्या दशकभरात अफगाणिस्तानला १ दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त गहू पुरवणे समाविष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!