Share

कसला शेंबडा आमदार निवडून देता रे; नारायण राणेंची ‘या’ आमदारावर टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद काही नवा नाही. नारायण राणे जेव्हा संधी मिळेल तेव्हा शिवसेनेवर किंवा त्यांच्या नेत्यांवर टीका करतात. नारायण राणेंनी सावतंवाडीचे आमदार दीपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. सावंतवाडीत घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी तुफान टोलेबाजी करत दीपक केसरकरांवर जोरदार टीका केली आहे.

सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी दीपक केसरकरांवर केली आहे. एक साधा प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं नाही. चष्मा नाकावर आलेला पडायचा बाकी होता, असा विधानभवनातील प्रसंग नारायण राणेंनी भर सभेत सांगत दीपक केसरकरांवर टीका केली आहे.

दरम्यान, मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली होती. विधानसभेत मी एक इतिहास निर्माण केला आहे. मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही. अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!