मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मोदींनी आपल्या भाषणात ही घोषणा केली होती. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन नाना पटोले यांच्या भाषणाची क्लिप ट्विट करण्यात आली आहे. नाना पटोले म्हणाले, बैल आडमुठा असेल तर त्याला कसं चालवायचं हे शेतकऱ्याला माहीत असतं. त्यामुळे देशाचा पंतप्रधान कितीही आडमुठा असला तरी दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी त्याला बरोबर चालवण्याची व्यवस्था केली.
बैल आडमुठा असेल तरी त्याला कसं चालवायचं हे शेतकऱ्याला माहीत असतं. त्यामुळे देशाचा पंतप्रधान कितीही आडमुठा असला तरी दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी त्याला बरोबर चालवण्याची व्यवस्था केली: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले pic.twitter.com/Mqn4wU7tbs
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2021
पटोले पुढे म्हणाले, लोकशाही मिळाल्यानंतर एखाद्या शासनाच्या विरोधात वर्षभर आंदोलन चालू शकते हे आपण यातून बघीतलं, शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चालवून त्यांना चिरडण्यात आलं. पंतप्रधानांवर अजुनही शेतकऱ्यांचा विश्वास नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे पंतप्रधानांनी एखाद्या बाबीवर जेव्हा जेव्हा भाष्य केलं त्यावर सर्व देशाची जनता विश्वास ठेवायची, मात्र या पंतप्रधानांवर कुणाचाच विश्वास नाही. अविश्वासू पंतप्रधान देशाने पहिल्यांदा बघीतला आहे.
२०१४ च्या निवडणुकांत मोदींनी सांगितलं होतं पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करेल असे अश्वासन दिले होते आणि पंतप्रधान झाल्यानंतर ते म्हणाले मी शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणालोच नाही व्यापाऱ्यांची कर्जमाफी मी म्हणालो, असे ते म्हणाले आणि त्यामुळेच त्यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास संपला. तो जीआर नाही, तो कायदा आहे, त्याला लोकसभेत मांडून रद्द करावे लागणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आंदोलन न संपविण्याचे स्पष्ट केले आहे. असेही पटोले यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कसला शेंबडा आमदार निवडून देता रे; नारायण राणेंची ‘या’ आमदारावर टीका
- पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला गहू पाठवण्यास इम्रान खान यांची परवानगी
- अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचा हस्तक्षेपाचा प्रयत्न; सीबीआयचा आरोप
- शिवसेनेने साथ सोडली तरीही भाजपा हिंदूंच्या पाठीशी-अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

