Share

शिवसेनेने साथ सोडली तरीही भाजपा हिंदूंच्या पाठीशी-अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री व शिवसेनेने (Shivsena) सत्तेच्या लालसेपोटी हिंदूंची साथ सोडली असली तरीही भाजपा हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. हिंदूंवरील भ्याड हल्ले सहन कले जाणार नाहीत, असा इशारा भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भाजपाच्या धरणे आंदोलनात ते बोलत होते.

नांदेड, अमरावती, मालेगाव येथील धार्मिक दंगलींच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भातखळकर म्हणाले, सध्या पोलिसांच्या बाबतीत जे जे समोर येत आहे, ते या दुपेडी व्यवस्थेचे वर्तमानातील प्रकटीकरण समजायचे का? मला खूप कीव येते आणि वाईट वाटतं की राजकारणासाठी आपण किती लाचार झालो आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) आज असते तर त्यांनी थोबाडीत लगावली असती.

राजकीयदृष्ट्या अडचणीत आणणाऱ्या प्रसंगातच नव्हे, तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्यांवरही विद्यमान सत्ताधाऱ्यांनी मौनव्रत धारण करण्याचे धोरण अवलंबिलेले दिसते. दहशतवादी कारवायांचे वारंवार लक्ष्य ठरलेल्या या राज्यात दाऊदचे हस्तक आजही बड्या नेत्यांपर्यंत पोहोचू शकतात. आपला एक मोठा आणि मूलभूत महत्त्वाचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की मोदी सरकारवर ओढवली आहे. हा शेतकरी आंदोलकांचा मोठाच विजय आहे.

महाराष्ट्रात नेहमीच धार्मिक दंगल घडविणाऱ्या व या दंगलीत सुद्धा हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी. ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना तत्काळ अटक करावी स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई तात्काळ बंद करावी. त्यांच्यावरील तसेच भाजप कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी अतुल भातखळकरांसह मुंबई भाजप पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!