Share

‘कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने आणि आता जन आशीर्वाद यात्रा काढून आणखी आमंत्रण दिलं जातंय’

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. मात्र भाजपच्या या यात्रेवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.

कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जनआशीर्वाद यात्रा नसून ‘जनअपमान यात्रा’ असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत केली. भाजपने शुक्रवारपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असून या यात्रेची पोलखोल करण्याची मोहीम राष्ट्रवादीने उघडली आहे. २१ ऑगस्टपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करत आहेत. आज जनआशीर्वाद यात्रा रायगडमध्ये असून राष्ट्रवादीने अलिबाग येथे पत्रकार परिषद घेतली.

पंतप्रधान मोदींचे सरकार आल्यावर लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. आता जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांचा अपमान करण्याचे काम भाजपवाले करत आहेत, असा आरोप महेश तपासे यांनी केला. कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने झाली. त्यानंतर बंगालच्या निवडणुकीच्यावेळी दुसरी लाट आली आणि आता जनआशीर्वाद यात्रा काढून तिसऱ्या लाटेला भाजप आमंत्रण देत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!