Share

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून ‘या’ दिग्गज नेत्याला संधी…

Published On: 

पुणे : राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

यासाठी आता भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघात नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार म्हणून रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने अरूण लाड व उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. आता उमेदवार देण्यात भाजपने आघाडी घेतली असून महाविकासाघादीच्या उमेदवारांच्या नावांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!