Share

सरकारचे नेमके काय चाललं आहे, हे मराठा समाजालाही कळू द्या?

Published On: 

नांदेड – राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले आहे.सकारामधील समन्वयाच्या अभावामुळे राज्यभरात सध्या गोंधळाचे वातावरण आहे.यातच मराठा समाज आक्रमक होत असताना आता, राजसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाच्या सुनावणी संदर्भात न्यायालयाच्या मागील तारखेस न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सरकार कमी पडले. त्यावेळी न्यायालयात राज्य सरकारचा प्रतिनिधी का उपस्थित राहिला नाही? तसेच राज्य सरकारला मदत करण्यासाठी मराठा समाजातील तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करावी, अशी मराठा समाजाची मागणी आहे. मात्र, सरकारकडून कोणतेचे योग्य पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे सरकारचे नेमके काय चाललं आहे, हे मराठा समाजालाही कळू द्या? अशी मागणी करत संभाजीराजेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

काल नांदेड येथील मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला संबोधित करत असताना, संभाजीराजेंनी वरील भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 2007 पासून माझा लढा सुरू आहे. बहुजन समाज हा एका छताखाली, एकत्र यावा, गुण्यागोविंदाने नांदावा, अशी माझी भूमिका आहे. बहुजन समाजाला एकत्र आणायचे असेल, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले.

अशोकराव चव्हाणांनी समाजातील, योग्य त्या विद्वान लोकांची एक समिती बनवावी. त्यांच्या अभ्यासाचा लाभ, न्यायालयात बाजू मांडताना वकिलांना होऊ शकेल. अधिकारी आणि सरकारने एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. ती उणीव मागच्या काळात न्यायालयात बाजू मांडताना दिसत राहिली. त्याचा मोठा फटकाही बसला. परंतु यापुढे, त्या चुका टाळत योग्य त्या पद्ध्तीने तयारी करून, कोर्टात समाजाची बाजू मांडली पाहिजे असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!