पुणे : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. पुणे शहरात सलग नवव्या दिवशी कोरोनामुक्तांचा आकडा हा कोरोना बाधितांपेक्षा अधिक आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज दिवसभरात ३ हजार ८७१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, ६ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना मुक्तांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत आहे.
दिवसभरात ६ हजार १५९ रुग्णांना डिस्चार्ज !
शहरातील ६ हजार १५९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ५४ हजार ८४० झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 27, 2021
पुणे शहरात आज एकाच दिवसात १६ हजार ६५० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २० लाख ६६ हजार ८१३ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ५७ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
दरम्यान, शहरात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशातच, राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे. मात्र, राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून अधिक काळजी घेणं महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदीजी पाहा! बैठकीत मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना १४ हजारांचा दंड
- घाटीत निवासी महिला डॉक्टरला मारहाण करणारा गजाआड
- परमबीर सिंह गोत्यात ? अंडरवर्ल्डशी संबंध ते सोन्याची बिस्किटे, पोलीस अधिकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप
- आनंदाची बातमी! रशियन लस ‘स्पुतनिक-व्ही’ १ मे रोजी भारतात होणार दाखल
- ‘हमने तो जलने का हुनर भी तुफानों से सीखा है’, आनंद महिंद्रांची कोरोना योद्ध्यांना अनोखी सलामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

