Share

घाटीत निवासी महिला डॉक्टरला मारहाण करणारा गजाआड

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : माझ्या मित्रावर आणि त्याच्या नातेवाईकावर योग्यप्रकारे उपचार का करीत नाही असे म्हणत एका मद्यपीने घाटीतील निवासी महिला डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घाटी दवाखाना परिसरातील वॉर्ड क्रमांक १० जवळ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी विल्सन विल्यम्स रेड्डी (रा.सिडको एन-६, परिसर) याला अटक केली.

घाटी रूग्णालयातील निवासी महिला डॉक्टर रचना रमन ह्या रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या सहकार्यांसोबत ड्युटीवर जात होते. त्यावेळी वॉर्ड क्रमांक १० समोर विल्सन रेड्डी याने डॉ.रचना रमन व सोबतच्या सहकार्यांना अडवून तुम्ही माझा मित्र प्रतिक आणि त्याच्या नातेवाईकावर योग्य प्रकारे का उपचार करीत नाही असे म्हणून वाद घालण्यास सुरूवात करून धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली.

यावेळी विल्सन रेड्डी याने मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब तिडके, डॉ.आमेर तडवी, डॉ.मनोज, डॉ.संकेत मगर यांना देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा प्रकार लक्षात आल्यावर घाटीतील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक गौरव साळुंखे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेवून विल्सन रेड्डी याला ताब्यात घेतले. गौरव साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाNया विल्सन रेड्डी याच्याविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक बहुरे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विल्सन रेड्डी याला न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस.पुराडउपाध्ये यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!