Share

आनंदाची बातमी! रशियन लस ‘स्पुतनिक-व्ही’ १ मे रोजी भारतात होणार दाखल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, लसीची कमतरता भासत असतानाच आनंदाची बातमी आली आहे. सध्या कोरोना व्हायरसवर रामबाण उपाय म्हणून समजली जाणारी रशियन लस ‘स्पुतनिक-व्ही’ एक मे रोजी भारतात दाखल होणार आहे. या लसीच्या आयातीला केंद्र सरकारने आधीच मंजूरी दिली असून रशियन सरकारने देखील परवानगी दिली आहे.

भारतात एक मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात आयात करण्यात येणाऱ्या रशियन लसीचा पहिला हप्ता दाखल होणार आहे. केंद्र सरकारने देशातील प्रमुख पाच लस उत्पादक कंपन्यांशी एका वर्षात ८५ कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.

‘स्पुतनिक-व्ही’ या लसीची निर्मिती ‘गॅमलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी’ने केली आहे. कोरोनाच्या लढाईत ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. रशिया वगळता जगातील इतर देशांसाठी या लसीची किंमत ७०० रुपयांच्या खाली निश्चित करण्यात आली असून इतर लसींच्या तुलनेत आमच्या लसीची किंमत खुपच कमी असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!