Share

परमबीर सिंह गोत्यात ? अंडरवर्ल्डशी संबंध ते सोन्याची बिस्किटे, पोलीस अधिकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात अली होती. यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु असून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने देशमुखांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केले असून परमबीर सिंह यांच्यावर आणखी गंभीर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याचे समजत आहे.

परमबीर सिंह यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने याबाबतचे गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याबाबत पत्र देखील लिहिले आहे. परमबीर सिंग हे १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ या काळात ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठबळ देऊन भष्टाचार केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव घाडगे यांनी केला आहे.

या पत्रात घाडगे यांनी परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनचे डिसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहाय्य्क पोलीस आयुक्त यांच्याकडून प्रत्येकी २० ते ३० तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून सुमारे ३० ते ४० तोळे सोन्याचे बिस्कीटे घेतली आहेत. इतकंच नाहीतर पत्नीच्या नावे इंडिया बुल या कंपनीमध्ये पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची गोपनीय माहिती असल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!