Share

पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ७२ तासांत विनयभंग करणाऱ्या आरोपीला सुनावली शिक्षा

Published On: 

🕒 1 min read

पुणे: विनयभंग प्रकरणी आरोपीला ७२ तासांत दोषी ठरवून पुणे सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पुणे सत्र न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjwadi Police) देखील मोठी कामगिरी बजावली आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलिसांनी ३६ तासांत चार्ज शीट दाखल केल्याने आणि न्यायाधीश श्रद्धा डोलारे (Justice Shradha Dolare) यांनी सलग तीन दिवस सुनावणी घेतली आणि निकाल मार्गी लावला. आरोपी हॉटेल व्यावसायिक समीर श्रीरंग जाधवला १८ महिने सक्त मजुरीची आणि ९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं पीडित महिलेच्या घरात शिरला आणि तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान, पीडिता प्रतिसाद देत नसल्यानं आरोपीनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी याप्रकरणी २५ जानेवारीच्या सायंकाळी पाच वाजता आरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंतांनी तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मुदळ यांच्याकडे सोपवला.

पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (Ravindra Mudal) यांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि दुसरीकडे सबळ पुरावे आणि साक्षीदारांची जुळवाजुळव करून चार्ज शीट तयार ठेवली. २७ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता आरोपी समीरला बेड्या ठोकत त्याची वरात थेट न्यायालयात काढली. हिंजवडी पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत केस फास्ट ट्रॅक कोर्टात आणली. न्यायाधीश श्रद्धा डोलारे यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. पीडितेची बाजू सरकारी वकील विजयसिंह जाधवांनी मांडली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!