मुंबई : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली ऍश बार्टी ४४ वर्षाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन ओपन एकेरी जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली आहे. बार्टीने अमेरिकेच्या ग्रँडस्लॅम फायनलिस्ट डॅनिएल कॉलिन्सचा पराभव केला. बार्टीने १ तास २७ मिनिटांत ६-३ , ७-६ अशी स्कोअरलाइन जिंकली. बार्टीने याआधी फ्रेंच ओपन (२०१९) आणि विम्बल्डन (२०२१) यासह तीन ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद जिंकले आहेत.
बार्टीने एका सर्व्हिस ब्रेकसह पहिला सेट जिंकला पण दुसऱ्या आणि सहाव्या गेममध्ये सर्व्हिस सोडल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ५-१ अशी पिछाडीवर होती. कॉलिन्सला सेटसाठी सर्व्हिस करण्याच्या दोन संधी होत्या परंतु दोन्ही वेळा त्या तोडल्या गेल्या. बार्टीने हा सेट टायब्रेकरवर गेल्यानंतर वर्चस्व राखले आणि ४-० अशी आघाडी घेतली होती.
????????❤️
The moment Evonne Goolagong Cawley crowned @ashbarty the #AusOpen women's singles champion ????#AO2022 pic.twitter.com/ASBtI8xHjg
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2022
१९८० मध्ये वेंडी टर्नबुलनंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी बार्टी ही पहिली ऑस्ट्रेलियन महिला होती .आणि आता १९७८ मध्ये ख्रिस ओ’ नायल नंतर ती पहिली ऑस्ट्रेलियन चॅम्पियन आहे. तिच्यावर या नवीन जेतेपदासाठी सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अन्य राज्यात काही असो परंतु महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही- रावसाहेब दानवे
- “….बाबत चंद्रकांत पाटलांनी इतकं हळवं होण्याची गरज नाही”, हसन मुश्रीफांचा खोचक टोला
- अजित पवारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची टीका; म्हणाले,‘महिलाही पिल्या तरी…’
- आता राशिद खानवरही चढला पुष्पाचा फिवर; VIDEO शेअर करत म्हणाला, “फायर है में!”
- “सत्ता टिकवण्यासाठी आणि काँग्रेसचे लांगूलचालन करण्यासाठी शिवसेना भूमिका घेत नाही”, ‘त्या’ प्रकरणावरून दरेकरांची टीका


