Share

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Veteran singer Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा व्हेंटिलेटरचा आधार काढण्यात आला होता. आता त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले आहे. असे ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले आहे.

९२ वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोना झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लता मंगेशकर यांची तब्येत बिघडली तेव्हापासून सर्वजण त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशा शुभेच्छा देत आहेत. ८ जानेवारी २०२२ रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लता मंगेशकर अनेक दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सध्या त्यांचा व्हेंटिलेटरचा आधार काढण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा झाली आहे. आता त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!