Share

पुण्यात कोरोनाचा कहर : नवीन नियमावली जाहीर, वाचा काय राहणार सुरु काय होणार बंद !

Published On: 

पुणे : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. काल ( २५ मार्च ) पुणे शहरात तब्बल ३ हजार २८६ रुग्णांची भर पडली आहे. तर पुणे जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ७१० झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात काल ६ हजार ४३२ नवीन रुग्णांचा समावेश आहे.

पुण्यातील याच कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला पाहता पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिकांचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, दोन्ही पालिकांचे आयुक्त, दोन्ही शहरांचे पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर अजित पवार यांनी तूर्तास पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांनी नियम पाळले नाही तर २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

नव्या नियमावलीनुसार काय सुरु, काय बंद ?

1 एप्रिलपासून सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश

शाळा-महाविद्यालयं 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.

मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम अनिवार्य

सार्वजनिक बस वाहतूक सुरू

लग्न समारंभात फक्त 50 लोकांचीच उपस्थिती

अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच परवानगी

सार्वजनिक उद्यानं, बागबगीचे फक्त सकाळच्याच वेळेत सुरू

उपहारगृह, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु राहतील

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!