Share

चारशे वर्षांच्या इतिहासावर कोरोनामुळे गदा! २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार नाथ सोहळा

Published On: 

पैठण : चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या नाथयात्रा उत्सवावर कोरोना संसर्गामुळे विरजन पडले असून सलग दुसर्‍या वर्षी पारंपरिक सोहळा रद्द करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रातील इतर देवस्थानच्या धर्तीवर पैठण येथील उत्सवाला परवानगी देण्याची मागणी नाथवंशजांनी लावून धरली. त्यामुळे शेवटी तालुका प्रशासनाने २० मानकरींच्या उपस्थितीत नाथ सोहळ्याला परवानगी दिल्याने नाथ उत्सवाचा मार्ग मोकळा झाला.

तुकाराम बीजेपासून प्रारंभ होणार्‍या नाथ उत्सवाला वीस मानकर्‍यांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी (दि. २५) रोजी संध्याकाळी प्रभारी तहसीलदार निलावड यांच्या दालनात उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावड, पो. नि. किशोर पवार तसेच नाथवंशज रावसाहेब गोसावी, रघुनाथ बुवा पालखीवाले, हरीपंडित गोसावी, योगेश महाराज पालकीवाले यांच्यात संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी पंढरपूर, देहु ,आळंदी देवस्थानच्या धर्तीवर २० मानकर्‍यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यास तसेच पारंपरिक नाथ सोहळ्यास परवानगी देण्याची मागणी नाथ वंशजांनी केली. उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी ही मागणी मान्य करीत उपस्थितांनाकोरोनाचे सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी दिले. तसेच परवानगी पेक्षा अधिक वारकरी किंवा मानकरी जमा झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी मोरे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!