औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत. बीड जिल्हयात २६ मार्च ते ४ एप्रिल ‘लॉकडाऊन‘ आहे. दरम्यान या काळातील सर्व पेपर संबधित महाविद्यालयात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मधील पदवी अव्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्च पासून सुरु झाल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बीड, जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हयात या परीक्षा होत आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा होत आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यांनी बीड जिल्हयासाठी २५ मार्च च्या मध्यरात्री पासून लॉकडाऊन लागु केला आहे. सद्या विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. या काळात २६ मार्च, ३० मार्च व ३१ मार्च व १ एप्रिल रोजी विद्यापीठाचे पेपर असणार आहेत. तर उर्वरित दिवशी पेपरला सुट्टया आहेत. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील. त्यात कुठलाही बदल केलेला नाही. तरी ही बाब सर्व संबधित विद्यार्थी, पालक, अध्यापक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच कोव्हीड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषगांने नियमांचे काटेकोर पणे पालन करुन परीक्षा घेण्याच्या सुचना केलेल्या आहेत. तसेच या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत – जास्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील, बाहेरच्यांनी…काँग्रेसचा राऊतांना टोला
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

