Share

खुप गरजेचे काम असेल तरच बाहेर पडावे, पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या सुचना

Published On: 

परभणी : महसूल, महापालिका, आरोग्य विभाग व आम्ही पोलिस प्रशासन स्वत: च्या कुटूंबाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करत आहोत. नागरिकांनी पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, खुप गरजेचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे, रस्त्यासह बाजारपेठेमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. तर नागरिकांनी घराच्या बाहेर मास्क शिवाय बाहेर पडू नये, सतत साबनाने स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, त्याचबरोबर प्रशासनाने जारी केलेले कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. बाजारपेठेत गर्दी करू नये, जर नियमांचे उल्लंघण होत असेल तर नक्कीच कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सध्या परीक्षेचा काळ आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. रस्त्यावर, बाजारपेठेत गर्दी दिसली तर तेथेच कारवाई करण्यात येईल. वेळ प्रसंगी कठोर भूमिकाही घ्यावी लागेल असेही मीना यांनी या वेळी पत्रकार परिषदेत सांगितले. 

कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे, नाही तर प्रशासनास कठोर भूमिका घेण्यास भाग पाडू नये, नियमांचे पालन करावे, असेही सांगताना महसूल प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन हे सर्व अधिकारी, कर्मचारी सातत्याने कोरोनाविरोधात लढत आहोत. अशा वेळी प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. आम्ही सर्वजण कोरोनाशी दोन हात करत आहोत. आमचेही कुटूंब आहे, मात्र, कोणतीही पर्वा न करता या सर्व विभागातील अधिकारी – कर्मचारी सातत्याने कोरोनाविरोधात लढा देत आहोत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी, कोरोनास रोख बसावा यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित असल्याचेही यावेळी मीना यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!