🕒 1 min read
पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी वनडे पुण्यात सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. पहिल्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्याच्या जागी संघात ऋषभ पंतला संधी मिळाली.
ऋषभ पंतने गेल्या काही महिन्यात कसोटी आणि टी-२० मध्ये धमाकेदार फलंदाजी केली आणि विकेटच्या मागे देखील चांगली कामगिरी केली. यामुळेच पंतला वनडे संघात स्थान मिळाले. दिल्लीच्या या स्टार फलंदाजाला दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी संघात स्थान मिळाले. ऋषभ पंतने देखील संधीचं सोने करत अवघ्या ४० चेंडूंत ७७ धावा पटकावल्या. या तडाखेबंद खेळीत पंतने ३ चौकार आणि ७ उतुंग षटकार ठोकले. पंतचे ७७ आणि आणि के.एल. राहुलच्या १०८ धावांच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ३३६ धावांचा डोंगर उभा केला आहे.
दरम्यान, याआधी पंतने अखेरची आंतरराष्ट्रीय वनडे मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ जानेवारी २०२० मध्ये खेळली होती. मुंबईत झालेल्या त्या वनडेनंतर ४३६ दिवसांनी वनडेत विकेटकिपर म्हणून पंतला स्थान देण्यात आले. न्यूझीलंड दौऱ्यात पंत भारतीय संघात होता. तेव्हा भारताने ५ टी-२० आणि ३ वनडे मॅच खेळल्या. पण तेव्हा त्याला अंतिम ११ मध्ये निवडण्यात आले नाही. विकेटकिपर म्हणून केएल राहुलने जबाबदारी स्विकारली होती.
महत्वाच्या बातम्या
- कलारसास्वाद विषय वैकल्पिक न ठेवता पूर्वरत करावा, कला शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ना शिक्का, ना पोस्टर…रुग्ण फिरताहेत बिनघोर!
- फडणवीसांचा नेमका विश्वास आहे तरी कुणावर? मुख्य सचिवांच्या अहवालावरही केले प्रश्न उपस्थित
- शेतकऱ्यांची भारत बंदची हाक, मात्र पंतप्रधान विदेश वारीत व्यस्थ – नाना पटोले
- कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
