Share

मांजरा धरणाचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी गेले वाया

Published On: 

बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यात मांजरा धरणाचा कालवा फुटल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. यावेळेस लाखो लिटर पाणी वाया गेले. मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाणी देणाऱ्या उजव्या कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण हे बीडसह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांना सिंचन व पाणीपुरवठा करण्यासाठी वरदान ठरले आहे. यंदा पाऊसही बऱ्यापैकी झाल्यामुळे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे. उन्हाळा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांना पाणी देण्यासाठी या कालव्यातून २२ मार्चपासून पाणी सोडण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उजव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आणि त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले शिवाय या कालव्याचा उपयोग होण्या ऐवजी शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची मांजरा धरणाकडे तसेच कालव्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून दिसत आहे. कालव्याची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!