Share

पुण्याला म्युकरमायकोसिसचा विळखा ; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पुणे महापालिकेनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात 1 जूनपासून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचं डोअर टू डोअर जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. तशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. महापालिकेनं कमला नेहरू रुग्णालयात ओपीडी सेंटर तयार केलं आहे. सर्वेक्षणादरम्यान कुणी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्ण आढळल्यास त्याच्यावर दळवी रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. त्यासाठी दळवी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, ‘म्युकरमायकोसिसचे बाहेरील जिल्ह्यातील 19 रुग्ण सध्या पुण्यात उपचार घेत आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील 53 हॉस्पिटलमध्ये 591 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात म्युकरमायकोसिससाठी 2860 इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील 207 रुग्णांनी आतापर्यंत महात्मा फुले योजनेचा लाभ घेतला आहे.’ असे पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!