🕒 1 min read
मुंबई : रविवारी धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करून आणखी एक मालिका गुंडाळली आहे. भारताकडून श्रेयस अय्यरने ४५ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. भारताने १४७ धावांचा सहज पाठलाग केला. सामन्यानंतर भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने श्रेयसची मुलाखत घेतली. मात्र, त्यांची मुलाखत सुरु असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने व्यत्यय आणला. यावेळी चहलने सिराजच्या नवीन हेअर स्टाईलची मज्जा उडवली.
बीसीसीआयने (bcci) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, चहल (yuzvendra chahal) सिराजच्या (mohmmad siraj) हेअरस्टाईलची मज्जा उडवताना दिसत आहे. “अगर आप इनके (सिराज) बाल देखेंगे तो ऐसा लगा रहा है की घास को पानी नहीं मिला है और घास सुख गई है ( जर तुम्ही त्याचे केस बघितले तर ते कोरडे गवत असल्याचे दिसते ज्याला बर्याच काळापासून पाणी दिले गेले नाही.) युझीच्या वक्तव्यावर श्रेयसलाही (shreyas iyer) आपले हसू आवरता आले नाही. यावेळी तिघेही खळखळून हसताना दिसले.
From mantra of success to a guest apperance! ????????
Chahal TV Special: @ShreyasIyer15, with @mdsirajofficial for company, chats with @yuzi_chahal after #TeamIndia's T20I series sweep. ???? ???? – By @Moulinparikh
Full interview ???? ???? #INDvSL @Paytm https://t.co/FOL75d7bIs pic.twitter.com/4Awzp9BvIK
— BCCI (@BCCI) February 28, 2022
श्रेयस अय्यरला त्याच्या कामगिरीबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून गौरवण्यात आले. T20I मधला हा भारताचा सलग १२ वा विजय होता, जो अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या बरोबरीने टी २० फॉरमॅटमध्ये संघाने संयुक्त-सर्वाधिक विजय मिळवला आहे. T20I मालिकेच्या समाप्तीनंतर, आता भारतीय संघाचे लक्ष्य दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे आहे. मोहाली येथे ४ ते ८ मार्च दरम्यान पहिल्या कसोटीपासून सुरू होणार आहे. दुसरी कसोटी १२-१६ मार्च दरम्यान बेंगळुरू येथे खेळवली जाईल आणि ती दिवस-रात्रीची असेल.
महत्वाच्या बातम्या
- “भाजप क्रिमिनल सिंडिकेट चालवतंय”, संजय राऊतांचा दावा
- “सत्ता जाण्याच्या भीतीनेच उद्धव ठाकरे…”, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- केव्हिन पीटरसनने शेअर केली युक्रेनहून पोलंडला गेलेल्या कुटुंबावर उपडेट; पोलंड सरकारचे मानले आभार
- “चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले…”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- पंतप्रधान कार्यालयाला पुरावे सोपवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
