Share

ठाकरे कुटुंबाच्या घरी हलणार पाळणा; ‘शिवतीर्थ’ वरून आनंदाची बातमी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ठाकरे कुटुंबात लवकरच पाळणा हलणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच आजोबा होणार आहेत. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली अमित ठाकरेंकडे (Amit Thackeray will be father) आनंदाची बातमी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘शिवतीर्थ’ वर सध्या आनंदाचा माहोल आहे.

अमित ठाकरे यांना मराठी भाषा दिनाच्या पर्वाला मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच आता लवकरच एक वडिलाची जबाबदारीही त्यांच्यावर पडणार आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले आहेत. याच नवीन घरात आता लहान लेकराचा आवाजही गुंजणार आहे.

दरम्यान २०१८ साली डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली ( Amit and Mithali Thackeray) यांचा साखरपुडा झाला होता. मिताली या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले असून त्यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. अमित आणि मिताली यांची ओळख तशी जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर दोघंही विवाहबंधनात अडकले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!