Share

किरीट सोमय्यांमुळे पुणे भाजप येणार अडचणीत?

Published On: 

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्यांमुळे पुणे भाजप, भाजपचे काही नेते आणि त्यांचे निकटवर्तीय अडचणीत येण्याची शक्यता आहे. महापालिकेची जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातली जात आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांसदर्भात सोमय्यांनी 15 मार्च 2022 रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देखील लिहीले होते. त्या पत्रात खराडी सर्व्हे नंबर 53 पार्ट, 54 पार्ट येथील हजार 779 चौरस मीटरचा भूखंड डीसीपीआर नियम 21.11 समायोजन आरक्षण तत्व अन्वये एक्झिबिशन ग्राऊंड म्हणून आरक्षित होता. हीच जागा विकसनासाठी देऊन घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.

यासंदर्भात किरीट सोमय्यांकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु त्यामुळेच आता भाजपची अडचण झाली असल्याचं समोर दिसत आहे. भाजपच्या माजी खासदाराच्या निकटवर्तीयानं पालिकेवर दबाव आणत जागा खासगी बिल्डरला देण्यासाठी मध्यस्थी केल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं जर हि चर्चा खरी असेल तर भाजपची अडचणीत येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमय्यांनी केलेली मागणी 

राज्य सरकार व पुणे महापालिका आयुक्त बे यदेशीर पद्धतीने करोडो रुपयांचा प्लॉट हा कोलते पाटील रिअल इस्टेट प्रा. लि. या बिल्डरला ट्रान्सफर करत आहे. या संबंधी घोटळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!