Share

बाबूश मॉन्सेरात विजयानंतर भाजपावरच भडकले; म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

गोवा : शिवसेनाने गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये एंट्री घेतली याची जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी चर्चा उत्पल पर्रीकरांचं कापलेलं तिकीट, त्यांचा राजीनामा आणि बाबूश मॉन्सेरात यांना मिळालेली भाजपाचे उमेदवारी याची झालेली पाहायला मिळाली.

उत्पल पर्रीकरांना नाकारून तिकीट आपल्याला दिल्याचा निर्णय सार्थकी ठेवत बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपाला विजय मिळवून दिला असल्याचे दिसत आहे. ८०० हून जास्त मतांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उत्पल पर्रीकरांचा पराभव झाला आहे. आणि तेही अवघ्या ८०० मतांनी ही निवडणूक जिंकली व उत्पल पर्रीकरांनी त्यांना कडवी झुंज दिली असल्याचे बोलले जात आहे. असे असताना त्यांनी भाजपावरच तोंडसुख घेतले आहे.

‘भाजपा केडरनं मला स्वीकारलंच नाही’ – बाबूश मॉन्सेरात

बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपावरच तोंडसुख घेतलं आहे असे बोलले जात आहे. ‘मला वाटतं की भाजपा केडरनं मला पक्षात स्वीकारलेलंच नाही. मी याकडे त्या दृष्टीने पाहातो. जर उत्पल पर्रीकरांना इतकी मतं मिळत असतील, तर ती फक्त भाजपा केडरनं आपली मतं त्यांच्याकडे वळवल्यामुळेच मिळाली. मी फक्त हेच बघू शकतो. भाजपा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला डॅमेज कंट्रोल करण्यात अपयश आलं”, असे बाबूश मॉन्सेरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!