🕒 1 min read
नवी दिल्ली : आयपीएल २०२२ हंगामाला २६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. सर्व संघांचे खेळाडू आपापल्या संघाबरोबर जोडले जात आहेत. यातच मुंबई इंडीयन्स संघाचा जलदगती गोलंदाज जयदेव उनादकट ही त्यांच्या ताफ्यात सामील झाला आहे.
तो सध्या आपल्या संघाबरोबर मुंबईमध्ये आहे. तो मुंबई संघातून खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. तो मुंबई इंडीयन्स संघाच्या यू ट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “मी या हंगामासाठी खूप उत्सुक आहे. या संघाचा भाग बनणे माझे स्वप्न होते. वानखेडे हे माझे सर्वात आवडते मैदान आहे. त्याचबरोबर मुंबईचे मैदान जलदगती गोलंदाजांसाठी मदत करते. त्यामुळेच मुंबईच्या मैदानावरती खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. असे तो म्हणाला, तो शेवटी म्हणाला की, ‘चलो कप वापस ले आते है पलटण’.”
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात जयदेवला मुंबईने १ कोटी ३० लाख देऊन खरेदी केले आहे. याअगोदर तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्याने मुंबईचे पिच जलदगती गोलंदाजीसाठी मदत करते असे म्हणत चांगल्या प्रदर्शनाची उमीद ठेवली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
