Share

“मी दहशतवादी नसल्याचे जनतेने सिद्ध केले”- अरविंद केजरीवाल

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आम आदमी पक्षाने 24 जागा जिंकल्या असून, 91 जागांवर आघाडीवर देखील आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, पंजाबच्या जनतेने कमालच केली आहे. पंजाबचे जे निकाल आज आले आहेत, त्यात पंजाबचे अनेक दिग्गज निवडणूक हरले आहेत. सुखबीर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू, सीएम चरणजीत सिंग चन्नी हे निवडणूक हरले. पंजाबमध्ये आम्हाला रोखण्याचे कारस्थान करण्यात आली. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन अरविंद केजरीवाल दहशतवादी असल्याचे सांगितले, मात्र आज स्वतः जनतेने केजरीवाल दहशतवादी नसल्याचे सांगितले आहे.

शिक्षणासाठी परदेशात जावे लागणार नाही

यावेळी बोलतांना केजरीवाल म्हणाले कि, आम्ही असा भारत बनवू ज्यात भारतातील मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागणार नाही. त्याचा संदर्भ युक्रेनवरील रशियन हल्ल्यामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी होता. हे लोक देशाला लुटणारे दहशतवादी आहेत. असा भारत घडवू जिथे कोणीही उपाशी झोपणार नाही. आम्ही इतकी वैद्यकीय महाविद्यालये बांधू की आमच्या मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी जावे लागणार नाही.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, पंजाब आणि गोव्यातील जनतेने चमत्कार केला आहे. पंजाबने अरविंद केजरीवाल यांना फक्त मत नाही तर जनतेसाठी काम करण्याची संधी दिली आहे. यावेळी मनीष सिसोदिया यांनी बाबासाहेब आणि भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण करू, असा नारा देखील दिला.

जल्लोषाचे वातावरण 

आम आदमी पक्ष्याच्या दिल्लीतील मुख्यालयात जल्लोषाचे वातावरण सुरू झाले आहे. जोरदार विजय मिळवत पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. भगवंत मान आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या कार्यालयात लावण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!